महाराष्ट्र पोलीस – नंदा किशन आडे
पूर्ण नाव :
नंदा किशन आडे
मूळ गाव :
चिखली तांडा, ता. किनवट, जि. नांदेड
निवड झालेले पद :
महाराष्ट्र पोलीस
पोलीस सेवेत रुजू :
04/11/2014, जळगाव पोलीस
2025 जिल्हा बदली :
नांदेड पोलीस
यशोगाथा :
किनवट तालुक्यात भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षणासाठी
पाटील अकॅडमी सुरू झाल्याचे आम्हाला समजले. त्यानंतर
आम्ही मैत्रिणींनी मिळून अकॅडमी जॉईन करण्याचा निर्णय घेतला
आणि पोलीस होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले.
गावातील काही लोक आणि नातेवाईक आमच्यावर हसत होते.
"ही कुठे पोलीस होणार? काहीतरी टाईमपास करत आहेत,"
असे अनेकजण म्हणायचे. मात्र आमच्या घरच्यांनी आमच्यावर
विश्वास ठेवला आणि आम्हाला किनवटला पाठवले.
पाटील सर आणि मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीमध्ये
अतिशय शिस्तबद्ध नियम होते. मॅडमने आम्हाला अभ्यास कसा
करायचा, फिजिकलची तयारी कशी करायची आणि पोलीस भरतीसाठी
स्वतःला कसे तयार करायचे हे शिकवले.
आम्हाला जवळपास दोन वर्षे अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागले.
त्यानंतर भरती निघाली. पहिल्या भरतीमध्ये काही कारणास्तव
माझी निवड थोडक्यात हुकली. मात्र मी हार मानली नाही आणि
तिसऱ्या भरतीमध्ये माझे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
"परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही.
सातत्याने मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर
आपले स्वप्न नक्कीच पूर्ण होते."
आज पाटील सर आणि पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे
आम्ही अंगावर वर्दी घालून अभिमानाने आपले आयुष्य जगत आहोत.
आमच्या या यशाचे सर्वात मोठे श्रेय पाटील सर आणि पाटील
मॅडम यांना जाते.
"पाटील सर आणि पाटील मॅडम यांना मनापासून सलाम!
तुमच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही वर्दी परिधान करून
अभिमानाने सेवा करत आहोत. मॅडम, तुमचे मनापासून आभार!"
नवीन विद्यार्थ्यांसाठी संदेश :
लोक काय म्हणतात याचा विचार न करता आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा.
अपयश आले तरी थांबू नका. योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि सातत्यपूर्ण
मेहनत ठेवली तर पोलीस होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते.